P
PCOSCARE

पॉलिसिस्टीक ओव्हँरीयन सिंड्रोम

What is PCOS

पी. सी. ओ. एस्. हा तरुण मुली आणि स्त्रियांमध्ये होणारा एक सर्वसाधारण आजार (खरेतर अनेक लक्षणांचा समूह) आहे. भारतात गेल्या दहा वर्षांत हा आजार एखाद्या साथीसारखा पसरलाय. भारतातील १५ ते २० टक्के स्त्रियांना हा आजार आहे. मोठ्या शहरांत हे प्रमाण याहूनही जास्त आहे. हा आजार झालेल्या स्त्रियांना गर्भवती व्हायला अडथळा येतो. पी. सी.ओ.डी. म्हणजे पॉलिसिस्टीक ओव्हँरीयन सिंड्रोम. शब्दशः अर्थ, स्त्रीबीजग्रंथीत अर्धविकसित बीजेच बीजे दिसणे. संप्रेरकातील घोटाळ्यामुळे उद्भवणारा हा एक आजार आहे. यात स्त्रियांच्या शरीरात पुरुषरसांचे (Androgens) प्रमाण वाढते.

परिणामी स्त्रीबीजनिर्मिती महिन्याच्या महिन्याला होण्याऐवजी, अधून मधून व्हायला लागते. सोनोग्राफी केली, तर स्रीबीजग्रंथीत अर्धविकसित बीजांची रेलचेल दिसू लागते. पी.सी.ओ.एस्. हा खरेतर एक लक्षणसमुच्चय आहे. काही लक्षणे एकत्रित आढळली तर त्याला लक्षणसमुच्चय म्हणतात. अनियमित पाळी, वंध्यत्व, चेहऱ्यावर अनावश्यक केस उगवणे, मुरूम (तारुण्यपिटिका), वजन वाढणे, डोक्यावरचे केस गळणे इ अनेक लक्षणे पी.सी.ओ.एस्. मध्ये एकत्रित आढळतात.

अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करा

७४१०११२११२